महाराष्ट्र

थंडीचा कडाका वाढणार! हवामान विभागाचा इशारा

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

24 Jan :- राज्यात सध्या थंडीचा कडाका जास्त आहे. तापमान कमी जास्त होत असलं तरी थंडी मात्र कायम आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये पारा आणखी खाली घसरणार असून थंडीची लाट येणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. देशातल्या तापमानात मोठी घट होणार असल्याचंही हवामान विभागाचं म्हणणं आहे. त्या दृष्टीने नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या पाच दिवसांत उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताच्या बहुतांश भागांमध्ये किमान तापमानात ३ ते ५ अंशांनी हळूहळू घट होण्याची शक्यता आहे. तर २५ आणि २६ जानेवारी रोजी उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.