News

गोपीनाथ गडावर जाता आले नाही तरी सेवा कार्यात राहूनच मुंडे साहेबांचे दर्शन घ्या

पंकजाताई मुंडे मुंबईत निवासस्थानी  तर खा. प्रितमताई मुंडे गोपीनाथ गडावर जाऊन करणार लोकनेत्यास अभिवादन

परळी दि. ०२ —— लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिदिनी ३ जून रोजी गोपीनाथ गडावर जाऊन त्यांच्या समाधीचे दर्शन नाही घेता आलं तरी सेवा कार्यात राहूनच साहेबांचे दर्शन घ्या असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी केले आहे. दरम्यान, उद्या स्मृतिदिनी पंकजाताई मुंडे मुंबईत निवासस्थानी  तर खा. प्रितमताई मुंडे गोपीनाथ गडावर जाऊन लाडक्या लोकनेत्यास अभिवादन करणार आहेत. पंकजाताई मुंडे यांच्या फेसबुकवरून हा कार्यक्रम लाईव्ह होणार आहे.

  लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ३ जून रोजी मुंडे परिवारासमवेत नियोजित कार्यक्रम असा..सकाळी ११.३० वा.खा.प्रीतमताई मुंडे यांचे गोपीनाथ गडावर आगमन व समाधी  पूजन, दुपारी ११.५० वा. पंकजाताई मुंडे यांचे परिवारा सोबत मुंबई येथे निवासस्थानी प्रतिमा पूजन आणि संवाद हे कार्यक्रम पंकजाताई यांच्या फेसबुकवर लाईव्ह दिसतील.

प्रतिमेसमोर दोन दिवे लावा..सेवा कार्य करा
——————-
मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी सकाळी १० ते २ या वेळेत कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपले स्वतःचे घरच गोपीनाथ गड समजून मुंडे साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करायचे आहे.परिवारातील सर्व एकत्र या.. उजवीकडे महिला व डाव्या बाजूला पुरुष उभे रहा..महिलांनी एक व पुरुषांनी एक असे दोन दिवे लावा…मुंडे साहेबांचा आवडता पदार्थ करा आणि कोरोनाच्या या परिस्थितीत साजेसं एक समाज कार्य दिवस भरात करून ते फोटो पंकजा ताई यांच्या फेस बुक ,ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर पाठवा …स्वतः सुरक्षित रहा व समाजाला ही सुरक्षित ठेवा असे आवाहन पंकजाताई मुंडे यांनी फेसबुक पोस्टद्वारे केले आहे.