महाराष्ट्र

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कोरोनाच्या विळख्यात

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

24 Jan :- राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असताना दिसत आहे. दरम्यान राज्यातील अनेक राजकारणाऱ्यांना देखील कोरोनाने विळखा घातला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियावर त्यांनी याविषयी माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ते उपचार घेत आहेत. सोशल मीडियावर माहिती देत शरद पवार म्हणाले की, ‘माजी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र काळजीचे कोणतेही कारण नाही. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी उपचार घेत आहे.

गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात असलेल्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी स्वतःची चाचणी घ्यावी आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी.’ महाराष्ट्रात गेल्या 24 तासात कोविड-19 चे 40805 नवीन रुग्ण आढळले आहेत. 44 लोकांचा मृत्यू झाला असून 27,377 रुग्ण बरे झाले आहेत. शनिवारच्या तुलनेत नवीन प्रकरणे 5588 कमी आहेत. शनिवारी राज्यात 46,393 रुग्ण आढळले होते.

30,795 रुग्ण बरे झाले आणि 48 लोकांचा मृत्यू झाला होता. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या आता 2.93 लाख झाली आहे. आतापर्यंत एकूण 75.07 लाख लोक संसर्गाच्या विळख्यात आले आहेत. त्यापैकी 70.67 लाख लोक बरे झाले आहेत, तर 142115 लोकांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्हिटी दर 20.90% आहे. याच्या एक दिवस आधी, शनिवारी पॉझिटिव्हिटी दर 20.77% होता. ज्यामध्ये मुंबईत 2,550 नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. सक्रिय प्रकरणे 19,808 आहेत.