नवे संकट! राज्यात धुळीचे वादळ
23 जानेवारी :- गेल्या अडीच वर्षांपासून राज्यावर कोरोनाचे संकट कायम असून त्यात ओमायकॉनची भर पडली आहे. तर दुसरीकडे आता राज्यावर आणखी एक संकट घोंघावत आहे. राज्यात धुळीचे वादळ धडकले आहे. त्यामुळे उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रत दृश्यमानता कमी झाली आहे. धुलीकणाच्या वादळाने राज्यात आज दिवसभर वाहन धारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
पाकिस्तानकडून निघालेले धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्र मार्गे महाराष्ट्रत पोहोचले आहे. उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात दृश्यमानता कमी झाली असून मुंबई पुण्यात धुळीकणांचे प्रमाण वाढले आहे. पाकिस्तानातून आलेले धुळीचे वादळ आज रविवारी अरबी समुद्रात पोहोचले आहे. त्यानंतर या वादळाने पुणे, मुंबई आणि उत्तर कोकणात दाखल झाले आहे.
या वादळाने दृश्यमानता कमी झाली आहे. मुंबई आणि पुण्यात धुळीच्या वादळामुळे धुळीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि पुण्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच तापमानाची घट झाली आहे. त्यामुळे सोसाट्याचा वारा वाहत असून गारठा वाढला आहे. 20 ते 25 किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहत आहे. पुण्यात अतिसूक्ष्म धुलीकरणाचे प्रमाण पीएम 2.5 इतके आहे. तर धुलीकरणाचे प्रमाण सध्या पीएम १० प्रमाणे साधारणपणे १०० प्रति घनमीटर इतके झाले आहे.