बीड

लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

23 Jan :- बीड तालुक्यातील नेकनूर जवळ असलेल्या येळंबघाट येथुन धारूर कडे लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या छोटा हत्तीच्या चालकाचा ताबा सुटल्याने नांदुर फाटा जवळ गाडीने तीन चार पलट्या घेतल्याने गाडीत स्वार असलेल्या पाच जण गंभीर जखमी झाले आहेत जखमी पैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.

अपघाताची घटना आज सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली असुन घटनेची माहिती मिळताच नेकनुर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख यांनी सहकार्यसह घटनास्थळी तात्काळ भेट देऊन सर्व जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालय बीड येथे पाठविण्यात आले आहे. येळंबघाट येथील लग्न सोहळा धारूर येथे होता या सोहळ्यासाठी वऱ्हाडी मंडळी येळंबघाट येथून धारूर कडे छोटा हत्ती क्रमांक एमएच १४ डी एम २९५९ मध्ये स्वार होऊन जात असताना नांदुर फाटा जवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे.

अपघातात गाडीने तीन चार पलट्या घेतल्याने गाडीत स्वार असलेल्या १) लैला अख्तर शेख वय ४० वर्ष २) सय्यद नुरा वय ४५ वर्षे ३)शेख तय्यब वय २६ वर्षे ४) पठाण रशिदा बी वय ७० वर्षे ५) वहिदा इस्माईल शेख वय ४० वर्ष सर्व राहणार येळंबघाट ता. बीड हे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत तर तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच नेकनुर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख यांनी सहकार्यसह घटनास्थळी तात्काळ भेट देऊन सर्व जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालय बीड येथे पाठविण्यात आले आहे.