बीड

विचित्र अपघातात 3 जण जखमी

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

22 Jan :- नेकनुर येथे आज एक विचित्र अपघात झाला असून एक कार लातूरकडुन बीडकडे जात होती तर दुसरी कार नेकनुर कडुन केज कडे जात होती नेकनुर कडुन केज कडे जाणाऱ्या इंडिका कारच्या चालकाने आपली साईड सोडून तो लातूर कडुन येणाऱ्या कार समोर अचानक येउन थांबला त्यामुळे दोघांची समोरासमोर धडक होऊन तीन जण जखमी झाले आहे.

एअर बॅग ओपन झाल्याने दोघांचे जीव वाचले आहे. तर कार दुर खेड्यात जाऊन पडली आहे. या गाडीचा चालक दारूच्या नशेत होता असे प्रथमदर्शनी उपस्थित असणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे. जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालय बीड येथे पाठविण्यात आले आहे. आज सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास नेकनुर येथे पाटील पेट्रोल पंपाजवळ एक विचित्र अपघात झाला असून या अपघातात तीन जण जखमी झाले आहे.

नेकनुर कडुन केज कडे जाणाऱ्या इंडिका कार क्रमांक एमएच १४ बी सी २०८९ व लातूर कडुन बीड कडे जाणार्‍या कार क्रमांक एमएच २४ ए एफ ३५७० यांची समोरासमोर धडक होऊन तीन जण जखमी झाले आहे. हा अपघात इंडिका कारच्या चालकाने आपली साईड सोडून तो लातूर कडुन येणाऱ्या कार समोर अचानक येउन थांबला त्यामुळे हा अपघात झाला आहे. त्या कार मध्ये नवरा बायको होते परंतु कारचे एअर बॅग ओपन झाल्याने दोघांचे जीव वाचले आहे. परंतु महिलाच्या पायाला जबर मार लागल्याने पाय फ्रॅक्चर झाला आहे.

हा अपघात इतका भिषण होता की इंडिका कार दुर खड्यात जाऊन पडली आहे. याचा चालक दारूच्या नशेत तर्र होता तिच्या मुळे लातूर कडील दाम्पत्याना अपघाताला समोरा जाऊन आपले पाय गमवावे लागले आहे. अपघात घडताच तात्काळ लोकांनी अम्बुलन्सव्दारे जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालय बीड येथे पाठविण्यात आले आहे.