महाराष्ट्र

शाळां आणखी 8 दिवस बंदच राहणार

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

22 Jan :- कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंदच ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या कोरोना आढावा बैठकीत घेण्यात आला आहे. पुढील होणाऱ्या बैठकीत रुग्णसंख्येचा आढावा घेऊन याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

पर्यटनस्थळ, उद्याने, जलतरण तलाव यांबद्दल लवकरच नवी नियमावली जाहीर करणार असल्याची माहिती पवारांनीही दिली. शाळांचा निर्णय स्थानिक पातळीवरील प्रशासनाकडे सोपवण्यात आला आहे. त्यानुसार पुण्याच्या महापौरांनी शाळा सुरू करण्यास नकार दर्शवला होता. यानंतर आज पालकमंत्री अजित पवारांच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला.

मागील चोवीस तासात पुण्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडल्याने सध्या शाळा फक्त ऑनलाईन पद्धतीने सुरू ठेवण्याची घोषणा झाली. पुणे शहरातील जलतरण तलाव सुरु करण्याचा निर्णय पालकमंत्री कोरोना संसर्ग आढावा बैठकीत घेण्यात आला असून दोन डोस घेतलेले नागरिक आणि स्पर्धांसाठी तयारी करणारे खेळाडू यांनाच जलतरण तलावात प्रवेश असणार आहे.