महाराष्ट्र

सोमवारपासून कडाक्याची थंडी

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

21 Jan :- सोमवार पहाटेपासून 23 जानेवारी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वदूर भागातून विशेषकरून नाशिक, अहमदनगर, पुणे जिल्ह्यात तापमानात प्रकर्षांने घट होईल व 5 सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. हवामान विभागामार्फतही हेच अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत.

या काळात शेतातील उभ्या पिकांना कोल्ड बर्निंग होण्याची शक्यता असते. अतिथंडीमुळे पिके जळण्याचा धोका अधिक असतो. यामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांसह वेलवर्गीय पिकांबाबत वेळीच उपाययोजना कराव्यात, असे आवाहन अकोल्यातील वीरगाव येथील अद्ययावत विश्व हायटेक नर्सरीचे संचालक विरेंद्र थोरात यांनी केले आहे.