भारत

पंतप्रधान मोदी लोकप्रियतेत पुन्हा एकदा प्रथम क्रमांकावर

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

21 Jan :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जागतिक लोकप्रियता पुन्हा एकदा समोर आली आहे. एका सर्वेक्षणादरम्यान ग्लोबल वर्ल्ड लीडर्स लिस्टमध्ये पंतप्रधान मोदींची प्रथम क्रमांकावर निवड झाली आहे. या यादीत पंतप्रधानांना 71% अप्रूव्हल रेटिंग मिळाली आहे, तर त्यांच्यासह इतर जागतिक नेते रेटिंगच्या बाबतीत खूपच मागे आहेत. हे रेटिंग मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजन्सने जारी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांनी अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियासारख्या शक्तिशाली आणि विकसित देशांच्या प्रमुखांनाही मागे टाकले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना 43% रेटिंग मिळाले असून ते 6 व्या क्रमांकावर आहेत. कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष जस्टिन ट्रूडो यांनाही 43% रेटिंग पॉइंट मिळाले आहेत, परंतु त्यांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनंतर स्थान मिळाले आहे.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना 41% अप्रूव्हल रेटिंग मिळाली आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर मॅक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्रादार आहेत, ज्यांना 66% अप्रूव्हल रेटिंग मिळाली आहे. त्यांच्यानंतर तिसरा क्रमांक इटलीचे पंतप्रधान मारियो द्राघी यांचा आहे, ज्यांना 60% रेटिंग मिळाले आहे.