Newsक्राईम

कोळगांव येथील सुर्य मंदिरजवळ मोटारसायकल कारचा अपघात तीन जण गंभीर जखमी


तांदळा दि. १ (संतोष भारती):– गेवराई तालुक्यातील कोळगांव येथील सुर्य मंदिरजवळ राष्ट्रीय महामार्ग क्र.६१ वर मोटारसायकल आणि ट्रक्टर यांच्यात अचानक अपघात होऊन एकजण गंभीर जखमी झाले आहे. ही घटना दि.०१ जून २०२० रोजीच्या संध्याकाळच्या ०९ च्या दरम्यान घडली.
गेवराई तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र.६१ कोळगांव येथील सुर्य मंदिरजवळून समोरून येणाऱ्या मोटारसायकल क्रमांक एम. एच- २३ के. ९३६८ या मोटारसायकल गाडीला आणि ट्रक्टर क्रमांक एम एच २३ बी ७३१० यांच्यात अपघात झाला. यामध्ये मोटारसायकलवर असलेले तीन नागरिक पोखरी येथील भरत जालिंदर मोघे, बाळासाहेब सर्जेराव मोघे, जनार्दन काशीनाथ मोघे हे तीन जन जखमी झाले असून कोळगांव येथील ग्रामस्थांनी,हायवे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर चकलांबा पोलीस घटनास्थळी उशिरा विलंबाने दाखल होत होते.

या अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्गचे हायवे मेन्टनस पेट्रोलिंग अण्ड अँम्बुलस चे प्रमुख प्रशांत डिंदे, श्याम शिंदे, शिंदे यांनी घटनास्थळी दाखल होऊन जखमींना तातडीने महामार्गाच्या रूग्णवाहीतून दाखल केले. याचबरोबर जर राष्ट्रीय महामार्गावरील गावातील नागरिकांनी काही अडचणी, मदत लागल्यास ९०६६६५६८०१ या टोलफ्री दुरध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन हायवे पोलीस यांनी केले.