बीड

भरधाव गाडीची बाभळीच्या झाडाला धडक; 2 ठार 1 जण जखमी

झुंजार नेता प्रतिनिधी बालाप्रसाद जाजु तेलगाव

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

16 Jan :- परळीकडुन भरधाव वेगाने येणाऱ्या स्वीप्ट डिझायर गाडीची बाभळीच्या झाडाला जोरदार धडक बसुन झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी पावनेचार वाजे दरम्यान तेलगाव येथे घडली.

नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील तीन तरूण रविवारी एम.एच.१३ सीके ०४४१ या डिझायर गाडीने भोकर येथुन बीडला जात असताना तेलगाव येथे परळी रोडवर असलेल्या अमर बिअरबार समोरील बाभळीच्या झाडाला सदर गाडीची जोरात धडक बसुन हा अपघात झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असुन, अपघातात नेमके कोण ठार झाले त्यांची नावे अधिकृत समजले नाहीत.

अंदाजावरून युनुस शेख व सचिन मोकमपल्ले हे दोघे ठार झाल्याचा अंदाज वर्तवला जात असुन, अमोल वाघमारे हा तरूण गंभीर जखमी झाल्याचे समजते. हा अपघात एवढा भिषण व ह्रदयद्रावक होता की, मयत व जखमींना तेलगाव येथील नागरिकांनी व पोलीस कर्मचारी यांनी जेसीबीच्या सहायाने बाहेर काढले.जखमीस तात्काळ १०८ रूग्ण वाहिकेने रूग्णालयात हलवण्यात आले.