उपमुख्यमंत्री अजित पवारांचा राज्यातील जनतेला सूचक इशारा
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
15 Jan :- राज्यातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच भयावह होत असल्याचे दिसत आहे. रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यासोबतच राज्यातील निर्बंधही कठोर करण्यात आले आहे. आज याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील जनतेला सूचक इशारा दिला आहे. राज्यात 700 मॅट्रिक टन पेक्षा अधिक ऑक्सिजन गरज भासली तर मुख्यमंत्री कठोर निर्णय घेऊ शकतात, असे पवार म्हणाले आहेत.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना संदर्भातील राज्य स्तरावरील निर्णय हे राज्य प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेत असतात. त्याच्याबाबतची नियमावली मंत्री महोदयांनी जाहीर केली आहे. मात्र रुग्णांमध्ये वाढ होत आहे. बहुतेक जण घरीच थांबून उपाचार घेत आहेत. याविषयी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडूनही वेळोवेळी माहिती दिली जात आहे. मात्र असे होत असताना राज्यात ज्यावेळी 700 मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील असे देखील अजित पवार म्हणाले आहेत.
दरम्यान शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यातील मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित नव्हते. याविषयी बोलताना अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काही अडचणी असतील त्यामुळं ते बैठकीला उपस्थित राहिले नव्हते. त्याच्यावतीने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते. राज्याच्या मत्रिमंडळ बैठकीत लसी कमी पडतात त्यासंदर्भात चर्चा झालेली होती. मुख्यंमंत्री कोरोना संदर्भात निर्णय घेत आहेत, रोज आढावा घेतात. असे देखील अजित पवार म्हणाले.