बीड

बीड कोरोना रिपोर्ट…

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

15 Jan :- बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत आता झपाट्याने वाढू होऊ लागली असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आले आहे. शनिवारी १३५९ अहवालात ६४ रुग्ण पॉझिटिव्ह आले. राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असताना आता जिल्ह्यात ही नव्या रुग्णांची संख्या चांगलीच वाढली आहे.

बाधितांमध्ये अंबाजोगाई १८,
आष्टी ५,
बीड १२,
धारूर २,
गेवराई ५,
केज ६,
माजलगाव ४,
परळी ११,
पाटोदा ३,
शिरूर १ तर वडवणीत १ रुग्ण आढळले आहेत. दरम्यान नागरिकांनी आता वाढत्या आढळून रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.