दिवसा ढवळ्या गाडीची काच फोडून 7 लाख रुपये पळविले
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
13 Jan :- गेवराई शहरातील सेवालाल नगर भागात एका स्विफ्ट कार या गाडीत ठेवलेली बॅग आज्ञात चोरट्यांनी पळवली. सदरील बँगमध्ये सात लाखाची रक्कम ठेवलेली होती. हि घटना आज दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने गेवराई शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
गेवराई शहरातील सेवालाल नगर या ठिकाणी रहिवासी असलेल्या एका व्यक्तीने आपल्या स्विफ्ट डिझायर (गाडी क्र.- MH 23 BC9977) या कारमध्ये सात लाख रक्कम बॅग ठेवली होती. दरम्यान सदरील बॅग अज्ञात चोरट्याने गाडीची काच फोडून पळवली.
हा प्रकार दिवसा ढवळ्या घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तर माहिती मिळताच घटनास्थळावर गेवराई पोलिसांनी धाव घेतली. याठिकाणी पोलिसांनी पाहणी करून श्वानपथकास पाचारण केले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया गेवराई पोलिस सुरू आहे.