News

ज्यांचा कापुस विक्री करायचा राहिला अशा कापुस उत्पादकांनी तात्काळ बाजार समितीकडे कापसाची नोंदणी करावी – सभापती बडे

तेलगाव, –   कापुस उत्पादक शेतकऱ्यांचा कापुस  शासकीय कापुस खरेदी केंद्रावर विक्री करण्यासाठी शासनाने विक्री पुर्व नोंदणी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे अनेक शेतकऱ्यांनी कापसाची नोंदणी केली होती. परंतु तरीही बहुतांश शेतकऱ्यांच्या कापसाची नोंदणी करायची राहीली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी राहिलेल्या कापसाची नोंदणी करण्यास मुद्त वाढ  दिली आहे. तरी धारूर तालुक्यातील ज्यांचा कापुस विक्री करायचा राहिला अशा कापुस उत्पादक शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या कापसाची नोंदणी कृषी उत्पन्न बाजार समिती कडे करावी. असे आवाहन धारूर बाजार समितीचे सभापती महादेव अण्णा बडे यांनी केले आहे.      यासंदर्भात माहिती अशी की, कापुस उत्पादक शेतकऱ्यांचा कापुस हमी भावाने खरेदी करण्यासाठी शासनाने आयसीसी मार्फत शासकीय कापुस खरेदी केंद्र चालु केले आहेत. शासकीय कापुस खरेदी केंद्रावर कापुस उत्पादक शेतकऱ्यांची होणारी गर्दी लक्षात घेता .ज्या कापुस उत्पादकांना आपल्या  कापसाची विक्री करायची आहे त्यांनी बाजार समिती कडे पुर्व नोंदणी करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे अनेक शेतकऱ्यांनी कापसाची नोंदणी केली होती. परंतु बहुतांश कापुस उत्पादकांना नोंदणी करता आली नव्हती. त्यातच लाॅकडाऊन ही नोंदणी व कापुस खरेदी दोन्ही प्रक्रिया रखडल्या होत्या. मोठ्या प्रमाणात कापुस विक्री करायचा राहिला असल्याने याची दखल घेऊन जिल्हाधिकारी रेखावार यांनी बीड जिल्ह्यातील शासकीय कापुस खरेदी केंद्र चालु करण्याचे आदेश दिले होते. मात्र ज्या कापुस उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे त्यांचाच कापुस घेतला जात आहे. ज्यांची नोंदणी केली नाही त्यांचा कापुस घेतला जात नाही. त्यामुळे हाही कापुस खरेदी करण्याचे आदेश देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. याची दखल घेऊन जिल्हाधिकारी रेखावार यांनी राहिलेल्या शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी करण्यासाठी नोंदणी करण्याचे आदेश कृषी उत्पन्न बाजार समितींना दिले. त्यामुळे धारूर तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी कापसाची नोंदणी नाही अशांनी तात्काळ आपल्या कापसाची नोंदणी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे करावी. असे आवाहन ही सभापती महादेव अण्णा बडे यांनी केले आहे.