हॉस्पिटलच्या परिसरात आढळल्या अर्भकांच्या 11 कवट्या आणि 52 हाडं
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
13 Jan :- हॉस्पिटच्या परिसरात अर्भकांच्या ११ कवट्या आणि ५२ हाडं आढळल्याने एकच खळबळ उडालीय. पोलिसांनी एका खड्ड्यात सापडलेली ही अर्भकांची हाडं आणि कवट्या पुढील तपासणीसाठी नागपूरच्या प्रयोगशाळेत पाठवली आहेत. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर सखोल चौकशी करण्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे.
४ दिवसांपूर्वी आर्वीतील एका हॉस्पिटलमध्ये एका अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्यात आला. या प्रकरणी पोलीस तक्रार झाल्यावर हा बेकायदेशीर गर्भपात ३० हजार रूपये घेऊन करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी कारवाई करत डॉक्टरसह तिघांना अटक केली. बुधवारी (१२ जानेवारी) पोलिसांनी हॉस्पिटल परिसरात तपासणी केली. यावेळी रूग्णालयाच्या परिसरात एका खड्डयात ११ कवटया आणि ५२ हाडे आढळून आली.
पोलिसांनी हे अवशेष ताब्यात घेऊन नागपूरच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. कवटया आणि हाडे नेमके कुणाचे आहेत याबद्दल पोलीस तपास करत आहेत. अटकेत असलेल्या डॉक्टरची कसून चौकशी सुरू आहे. या हॉस्पिटलला अधिकृत गर्भपात व गर्भनिदान केंद्राचा दर्जा आहे. मात्र, मृत अर्भकाची विल्हेवाट लावण्याची वैद्यकीय पध्दत असते. ती या दवाखान्यात पाळली की नाही याबाबत पोलीस साशंक आहेत.
आर्वीचे उपविभागीय पोलीस अधिकारी साळूंके म्हणाले की सापडलेल्या अवशेषाबाबत आताच निश्चित काही सांगता येणार नाही. प्रयोगशाळेतून अहवाल आल्यानंतरच ठोस निष्कर्ष काढता येईल. सदरील खलबजनक घटना वर्धा जिल्ह्यात आर्वी येथे घडली आहे.