बीड

स्वातंत्र्य सैनिक मारुती भाऊ सानप यांचे निधन

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

11 Jan :- वडझरी येथील निजाम सरकारच्या विरोधातील क्रांतीकारक हर्सुल, औरगाबाद, आष्टी, बीड येथील जेलमध्ये शिक्षा भोगलेले 105 वर्ष वयाचे स्वातंत्र्य सैनिक स्वा.सै.मारुती भाऊ सानप यांचे दि.3 जानेवारी 2022 रोजी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात मुले भिमराव, शाहूराव, मुली आप्रुगाबाई, सुंनदाबाई, छबुबाई, नातवंडे, जावाई असा मोठा परिवार आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामात त्यांनी अनेक कॅम्पमध्ये सहभाग घेतला होता.

पाटोदा परिसरातील निजाम पोलिस/सरकारला सळो की पळो करुन सोडले होते. लेखक सतिष साळुंके लिखीत ‘बीड जिल्हा स्वातंत्र्य संग्राम’ या पुस्तकात त्यांच्या कार्याचा गौरव करुन नोंद करण्यात आलेली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेवून भारत सरकारने ताम्रपट/पदक देवून त्यांचा यथोचित सन्मान केला होता.

17 सप्टेंबर 2021 रोजी बीड येथील हुत्मात्मा स्मारक, राजीव गांधी चौक येथे त्यांनी हिरिरीने भाग घेवून हुतात्म्यांना श्रध्दांजली अर्पण केली होती. त्यांच्या जाण्याने बीड जिल्हा व सानप कुटूबिंयांवर शोककळा पसरली आहे. अशा थोर व ज्येष्ठ स्वा.सैनिकांला भावपूर्ण श्रध्दांजली.