किल्लेधारुर तालुक्यातील सोनिमोहा येथील व्यक्तीचा अहवाल निगेटीव्ह.
किल्लेधारूर (प्रतिनिधी) तालुक्यातील सोनिमोहा येथील एकाचा स्वॅब सोमवारी तपासणीसाठी लातूरच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता. त्याचा अहवाल निगेटीव्ह आला असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
तालुक्यातील सोनिमोहा येथील एकास ताप सदृश्य लक्षण आढळल्यामुळे व मुंबई प्रवासाचा इतिहास असल्याने केज येथील उपजिल्हा रुग्णालयातून सदरील इसमाचे स्वॅब लातुर येथील स्व. विलासराव देशमुख प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्याचा अहवाल सोमवारी संध्याकाळी प्राप्त झाला असून तो निगेटीव्ह असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. दरम्यान किल्लेधारुर शहरातील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे तसेच काल पाठवलेल्या तेलगांव येथील इसमाचा स्वॅब अन्कॉन्सेस आल्याने या सर्व व्यक्तींचे स्वॅब मंगळवारी पाठवण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.