बीडवासियांना आज दिलासा,सर्व अहवाल निगेटिव्ह
बीड- जिल्ह्यातून पाठविण्यात आलेले आजचे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांनी दिली आहे.
जिल्ह्यातून सामान्य रुग्णालयातून 7, केज व परळीच्या उपजिल्हा रुग्णालयातून प्रत्येकी 1 असे एकूण 9 स्वॅब पाठविण्यात आले होते. हे सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.काळजी घ्या,स्वस्थ राहा