बीड

गॅसचा मोठा भडका; 6 जण भाजले!

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

10 Jan :- गॅस लिकेज होऊन उडालेल्या भडक्यातील दोन घटनांमध्ये नाशिक जिल्ह्यात 6 जण भाजले आहेत. यातील पहिली घटना ही इगतपुरी येथे घडली असून, येथील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. तर दुसरी घटना म्हसगण शेजारील जांभुळपाडा येथे घटली आहे. या घटनेमध्ये चार जण भाजले आहेत. यातील जखमी मुलावर इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मुनाफ शेख हे जास्त भाजल्याने त्यांच्यावर नाशिक येथील नारायणी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र, दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

इगतपुरी येथे मुनाफ शेख यांच्या घरी गॅस गिझर लावण्यात आले आहेच. मात्र, गिझरचा गॅस लिक झाला. घरातील मंडळींनी नेहमीप्रमाणे आंघोळीसाठी पाणी गरम करायला गॅस गिझर सुरू केला. मात्र, त्यामुळे आगीचा मोठा भडका उडाला.

या घटनेत मुनाफ शेख भाजले गेले. त्यांनी आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर त्यांचा आवाज ऐकूण त्यांचा मुलगा त्या दिशेने धावला. त्यामुळे तोही भाजला जावून जखमी झाला. मात्र, त्याने प्रसंगावधान राखत दरवाजा बंद केला. मात्र, गॅसचा भपका आणि जोर इतका होता की त्यामुळे बाथरूमच्या काचा फुटून बाहेर पडल्या तर दरवाजाही तुटला.