राज्याला लॉकडाऊनचे डोहाळे; शाळा, महाविद्यालय बंद
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
8 Jan :- राज्य सरकारने कोरोना संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय आज जारी केला .यामध्ये कोरोना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्याचे आदेश आज राज्य सरकारने जारी केले आहे. राज्यातील शाळा महाविद्यालय 15 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हे सर्व नियम दिनांक दहा जानेवारीच्या रात्रीपासून लागू असणार आहेत. हे नियम राज्यातील शाळा कॉलेज आणि कोचिंग क्लासेस ला लागू असणार आहे.
दहावी बारावीचे महत्त्वाचे प्रत्यक्षात वर्ग वगळता इतर 10 वी 12 वीचे कामे सुरू करण्यास शासनाने शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार परवानगी दिली आहे. या नवीन नियमानुसार नागरिकांना पहाटे पाच ते संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत अधिक लोकांना एकत्रित येता येणार नाही. त्याचबरोबर रात्री 11 ते पहाटे पाच पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.
लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त पन्नास लोकांना एकत्रित येण्यास परवानगी देण्यात आली असून त्याचबरोबर अंत्यसंस्कारासाठी यासाठी जास्तीत जास्त वीस लोकांना परवानगी देण्यात आली आहे. राज्यातील स्विमिंग पूल जिम स्पा वेलनेस सेंटर आणि ब्युटी सलून बंद असणार आहे. तर हेअर कटिंग सलून हे 50% क्षमतेने सुरू असणार आहे. रात्री दहा ते सकाळी सात या वेळेमध्ये ते पूर्णपणे बंद असणार आहे.
राज्यातील मनोरंजनाचे पार्क म्युझियम्स आणि इतर जे काही लोकल टुरिस्ट सेंटर आहेत पूर्णपणे बंद असणार आहे. शॉपिंग मॉल मध्ये 50% क्षमतेने यास परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल्स रेस्टॉरंट हे 50 50 टक्के क्षमतेने चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे तर रात्री दहा ते आठ वाजेपर्यंत पूर्णपणे बंद असणार आहे या काळामध्ये होम डिलिव्हरी देण्यास परवानगी देण्यात आली आहे.