महाराष्ट्र

आमदार शेलारांना जीवे मारण्याची धमकी देणारा गजाआड

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

8 Jan :- भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. शेलार यांनी पत्र लिहून पोलिसांकडे तक्रार दिली होती. या धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांनी काही तासांमध्येच अटक केली आहे. ओसामा समशेर खान (48) असे या व्यक्तीचे नाव आहे.

दरम्यान, भाजप आमदार आशिष शेलार यांना शुक्रवारी एका अज्ञात व्यक्तीने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. या घटनेनंतर शेलार यांनी पोलिसाकडे धाव घेतली होती. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने एका व्यक्तीला अटक केली आहे.

दरम्यान, आशिष शेलार यांना सतत दोन वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरुन धमकी देण्यात आली होती. शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. अत्यंत अर्वाच्य भाषेत शिविगाळ करत असल्याची माहिती समोर आली होती. या घटनेनंतर आशिष शेलार यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना शुक्रवारी पत्र लिहून तक्रार केली होती