महाराष्ट्र

मायलेकीने बापाच्या डोक्यात घातला खलबत्ता

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

7 Jan :- मुंबई पोलिसात कार्यरत असलेल्या एका पोलिसाची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही हत्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर पोलिसाची पत्नी आणि मुलीने केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे कल्याणमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या पोलिसाचे नाव प्रकाश बोरसे आहे. याप्रकरणी आता कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पोलिसाची पत्नी आणि मुलीला अटक केली आहे. ही हत्या घरगुती वादातून झाली असल्याची माहिती मिळते आहे.

प्रकाश बोरसे हे मुंबईत पोलीस दलात कार्यरत आहेत. गुरुवारी ते आपली ड्युटी संपवून घरी आले. यावेळी त्यांची पत्नी ज्योती आणि मुलगी भाग्यश्री यांच्यात घरगुती वाद विवाद झाले. यावेळी हे वाद इतक्या विकोपाला पोहोचला की ज्योती आणि भाग्यश्री यांनी बोरसे यांच्या डोक्यात खलबत्त्याच्या बत्ताने जोरदार प्रहार केला. यात ते गंभीर जखमी झाले, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झाला.

पोलीस कर्मचारी असलेले प्रकाश बोरसे हे मुंबईच्या कुर्ला पोलिस ठाण्यात कार्यरत होते. गुरुवारी आपली ड्युटी संपवून ते घरी आले या दरम्यान त्यांची पत्नी आणि मुलगी यांच्यात एका वाद झाले. प्रकाश बोरसे यांची मुलगी भाग्यश्रीचे काही महिन्यांपूर्वी लग्न झाले होते मात्र ती आपल्या पतीपासून विभक्त राहत आपल्या माहेरी राहत होती. हीच बाब प्रकाश बोरसे यांना खटकत होती. ते आपल्या मुलीला सासरी जाण्यासाठी वारंवार सांगत असत आणि यावरूनच बोरसे यांची पत्नी आणि मुलगी यांच्यात वाद-विवाद होत होते.

गुरुवारी देखील याच विषयावरून बोरसे कुटुंबीयांमध्ये वाद विवाद झाले आणि हा वाद इतका विकोपाला गेला की पत्नी आणि त्यांच्या मुलींने खलबत्त्याचा बत्ताने त्यांच्या कपाळावर जोरदार प्रहार केला यात ते गंभीर जखमी झाले आणि काही वेळाने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना ज्योती आणि भाग्यश्री याना अटक केल्याची माहिती तपास अधिकारी सुनील गवळी यांनी दिली.