News

केवळ १०० रुपयांसाठी भावाचा काढला काटा

आरोपीस ३ दिवसांची पोलिस कोठडी
तेलगाव,-बीडच्या माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड पोलिस हद्दीत खिशातील १०० रुपये घेतल्याच्या कारणाने सख्या भावाचा खुन केल्याची घटना शनिवारी रात्री घडली होती. दिंद्रुड पोलिसांत गुन्हा दाखल होताच तातडीने आरोपीस अटक करत सोमवारी न्यायालयात हजर केले असता ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

दिंद्रुड पोलिस हद्दीतील नाखले पिंपळगाव येथिल गजानन दशरथ काळे व लक्ष्मण दशरथ काळे हि दोन भावंडे राहत होती. उसतोड मजुरी वर उपजिवीका भागवणारे दोन्ही भाऊ दारु पिऊन सतत एकमेकांशी वाद घालायची यामुळे गावातील सहसा कुणी या कुटुंबाकडे लक्ष देत नव्हते. यातच शनिवारी रात्री १० ते ११ च्या दरम्यान लक्ष्मण या लहान भावाने मोठा भाऊ गजानन याच्या खिशातील १०० रुपये चोरल्याच्या कारणावरुन दोघा भावांत तुंबळ हाणामारी झाली यात डोक्यात मोठी जखम झाल्याने लक्ष्मण दशरथ काळे (वय २८ वर्ष) याचा जागिच मृत्यू झाला. रविवारी सकाळी घटनेची माहिती मिळताच दिंद्रुड पोलिस घटना स्थळावर दाखल होत आरोपी गजानन यास अटक करण्यात आली.सदर गुन्ह्याची आरोपी गजानन याने कबुली दिली असुन आरोपीस माजलगाव न्यायालयात हजर केले असता तिन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती दिंद्रुड पोलिस स्टेशन चे सपोनि अनिल गव्हाणकर यांनी दिली आहे.