राज्यासाठी नवे निर्बंध उद्या सकाळी जाहीर करणार- उपमुख्यमंत्र्यांची माहिती
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
4 Jan :- मुंबईनंतर आता पुण्यातील पहिली ते नववीपर्यंतचे सर्व वर्ग आणि कोचिंग संस्था पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. यामध्ये ऑनलाइन वर्ग चालवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे पाहता महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यामध्ये पहिली ते नववी पर्यंतचे वर्ग पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच, राज्यासाठी नवे निर्बंध उद्या सकाळी जाहीर करणार असल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यातही नववीपर्यंतच्या शाळा बंद, राज्यासाठी नवे निर्बंध उद्या सकाळी जाहीर करणार अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.