महाराष्ट्र

पुण्यातही शाळा बंद

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

4 Jan :- मुंबईनंतर आता पुण्यातील पहिली ते नववीपर्यंतचे सर्व वर्ग आणि कोचिंग संस्था पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. यामध्ये ऑनलाइन वर्ग चालवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोना संसर्गाची वाढती प्रकरणे पाहता महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे.

1 ली ते 9 वीपर्यंतच्या शाळा ३० जानेवारीपर्यंत बंद ! आठवडाभरात वाढलेली कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या प्रत्यक्ष सुरु असलेल्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय मा. पालकमंत्र्यांच्या कोरोना आढावा बैठकीत झाला आहे. सदरील वर्गांना ऑनलाईन परवानगी असेल. राज्यात कोरोनाचा नवा प्रकार प्रकार ओमायक्रॉन संसर्ग सुरू झाल्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे.

मुंबईनंतर आता पुणे शहरांतही मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आढळून येत आहे. त्यामुळे शहर हद्दीतील पहिली ते नववीपर्यंतच्या सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय कोविड आढावा बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा नव्याने अनेक निर्बंध लावण्यात आले आहे. यामुळे वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता राज्यातील महाविद्यालये सुरू ठेवायची की नाही याबाबतचा निर्णय उद्या दुपारी 4 वाजता घेतला जाणार आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.