आमदारस अटक, पोलिस स्टेशनमध्ये केला होता राडा
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
3 Jan :- पोलिस स्टेशनमध्ये जाऊन धिंगाणा घालून पोलिसांना अश्लील शिवीगाळ करणं भंडाऱ्याचे तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांना चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आमदार कारेमोरे यांना अटक केली आहे. त्यांना कोर्टात हजर केले जाणार असल्याची माहिती आहे.
राजू कारेमोरे यांनी 31 डिसेंबरच्या रात्री मोहाडी पोलिस ठाण्यात जाऊन गोंधळ घातला होता. यासोबतच पोलिसांना शिवीगाळ देखील केली होती. आपल्या व्यापारी मित्राच्या सांगण्यावरून त्यांनी हा राडा घातला होता.
या घटनेने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले होते. या प्रकरणानंतर रविवारी कारेमोरे यांनी माफीही मागितली होती. मात्र, आज पोलिसांनी सरकारी कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी कारेमोरे यांना अटक केली आहे. भंडारा पोलिसांनी त्यांना घरुन अटक केली आहे.