देश विदेश

ओमायक्रॉननंतर आता प्लोरोनाचे संकट

2 Jan :- संपूर्ण जग कोरोना आणि त्याचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे हैराण झाले आहे. दरम्यान, फ्लोरोनाचा पहिला रुग्ण इस्रायलमध्ये आढळून आला आहे. फ्लोरोना हा एक संसर्ग आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला कोरोना आणि इन्फ्लूएंझा या दोन्हीची लागण होते. हे पहिले प्रकरण असूनही इस्रायलने ते गांभीर्याने घेतले आहे.

त्याचवेळी, कोरोनाची चौथी लस देशातील कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना बूस्टर डोस म्हणून दिली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, फ्लोरोना हा कोरोना आणि इन्फ्लूएंझाचा दुहेरी संसर्ग आहे. दुहेरी विषाणूमुळे ते आणखी घातक आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, फ्लोरोनाची लागण झालेल्या रुग्णामध्ये न्यूमोनिया आणि मायोकार्डिटिससारख्या आजारांची लक्षणे दिसतात.