भारत

शाळेतील 85 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा

2 Jan :- काही दिवसांपूर्वीच बंद असलेल्या शाळां सुरु करण्यात आल्या. मात्र आता पुन्हा देशात कोरोना आणि ओमायक्रॉन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. उत्तराखंडातील नैनीताल जिल्ह्यातील जवाहर नवोदय या शाळेत सुमारे 85 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे शाळेत तसेच पालकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गंगरकोट परिसरातील एका शाळेत या विद्यार्थ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. नैनीतालचे उपजिल्हाधिकारी राहुल शाह यांनी सांगितले की, RT-PCR टेस्ट निगेटिव्ह आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पाठवण्यात येत आहे. देशात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 27,443 पॉझिटिव्ह केस समोर आले आहेत.

आज 282 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 9110 लोक बरे झाले आहेत. तर अॅक्टिव्ह पेशेंट्सची संख्या शनिवारी रात्री उशीरापर्यंत 18051 होती. 94 नवीन ओमायक्रॉन संक्रमितांसह देशात शनिवारी नवीन व्हेरिएंटच्या पेशेंट्सची संख्या 1596 झाली. यामधून 576 ओमायक्रॉन पेशेंट्स बरे झाले आहेत. तर 1020 अॅक्टिव्ह केस आहेत. शुक्रवारी 1,796 प्रकरणे आणि 1.73% पॉझिटिव्ह रेट नोंदवण्यात आला होता. तर गुरुवारी 2.44% पॉझिटिव्हिटी रेटसह 1,313 प्रकरणे नोंदवण्यात आली होती.