महाराष्ट्र

लॉकडाऊन बाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंच मोठं विधान

2 Jan :- गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाचे 9170 नवे रुग्ण आढळले. एकट्या मुंबईत 6 हजारांहून अधिक रुग्ण आढळले. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 32 हजारांहून अधिक आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी राज्यात सध्या लॉकडाऊनचा विचार नाही, मात्र निर्बंध अधिक कठोर केले जातील. राज्यात ऑक्सिजनची गरज 700 मेट्रिक टनावर गेली तरच लॉकडाऊन होईल, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येेथे सांगितले.

टोपे म्हणाले, ‘ओमायक्राॅनबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, या रूग्णांची तब्येत गंभीर नाही. डेल्टामुळे रुग्णांची तब्येत बिघडते आणि ऑक्सिजन लागतो, मृत्यूचे प्रमाण वाढते. त्यामुळे ओमायक्राॅन व डेल्टाचे प्रमाण कळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या कुणीही घाबरून जाऊ नये. परवा 5 हजार रुग्ण होते. काल साडेआठ हजार झाले’.

दरम्यान देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 22 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले. आदल्या दिवसापेक्षा ही वाढ 35 टक्के आहे. या काळात सक्रिय रुग्णांचा आकडा 13 हजारांनी वाढला असून ती संख्या एक लाखांवर गेली आहे.