बीड

पंकजा मुंडे ओमायक्रॉनची लागण

1 Jan :- भाजप नेत्या आणि माजी महिला व बालविकास पंकजा मुंडे यांना ओमायक्रॉन विषाणूची लागण झाली असल्याची माहिती समोर येत आहे. या अगोदर देखील पंकजा मुंडे यांना एप्रिल २०२१ मध्ये कोरोनाची लागण झाली होती. आता त्यांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे.

प्राप्त माहितीनुसार पंकजा मुंडे सध्या मुंबईतील त्यांच्या घरी क्वारंटाईन आहेत. त्यांना सौम्य लक्षणं असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरु आहेत. दरम्यान पंकजा मुंडे यांचा मुलगा आर्यमान यालाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.