बीड

महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर?

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

29 Dece :- महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. येथे नवीन प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. एकट्या मुंबईत नवीन प्रकरणांमध्ये वाढ झाल्याने राज्य सरकार चिंतेत आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत कोरोनाचे 2510 नवीन रुग्ण आढळून आले असून, ही संख्या एका दिवसापूर्वी नोंदवलेल्या रुग्णांच्या संख्येपेक्षा जवळपास 80% जास्त आहे.

दरम्यान, दिलासादायक म्हणजे मुंबईतील 251 रुग्णही संसर्गातून बरे झाले आहेत. येथे सक्रिय रुग्णांची संख्या 8060 आहे, तर 16 हजारांहून अधिक लोकांना साथीच्या आजारामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.ओमायाक्रॉन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई माहापालिकेत पर्यावरण मंत्री यांनी आदित्य ठाकरेंनी आपत्कालीन बैठक बोलावली होती. बैठकीनंतर जनतेला आवाहन केले आहे. ओमायक्रॉन आणि कोरोनाबाबत गंभीरता बाळगणे गरजेचे आहे, ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असू शकते. असे आदित्य ठाकरे म्हणाले.

31 डिसेंबर रोजी सार्वजनिक ठिकाणी पार्ट्यांवर निर्बंध लावण्यात आल्याची माहितीही दिली. तसेच शाळा-कॉलेजमध्ये 3 तारखेपासून लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. बूस्टर डोसचे देखील नियोजन सुरू असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे दिली. देशभरात ओमायक्रॉनची रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना मुंबईत कोरोनाचा उद्रेक झाला आहे.

या ठिकाणी काल दिवसभरात 1377 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यातच एका कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद देखील झाली आहे. गेल्या 7 महिन्यांचा हा उच्चांक आहेत. मुंबईत वाढत्या कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता आदित्य ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली. या निमित्त मुंबई माहापालिकेत आदित्य ठाकरेंनी आपत्कालीन बैठक बोलावली होती.