राज्यात किती कोटी नागरिकांनी घेतला पहिला डोस?
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
21 Dece :- कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉनमुळे राज्यात भीतीचे वातावरण आहे. ओमायक्रॉन वाढू नये यासाठी राज्य सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जातेय. दरम्यान लसीकरण मोहीम देखील वेगाने सुरू आहे. दरम्यान राज्यात आठ कोटी नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात माध्यमांशी बोलताना राज्यातील लसीकरणाविषयी माहिती दिली आहे. टोपे म्हणाले की, येत्या 15 ते 20 दिवसांत महाराष्ट्रात 100 टक्के लसीकरण होणार आहे.
ओमायक्रॉन हा संसर्गजन्य असला तरी तो धोकायदायक नाही असेही टोपे म्हणाले. तसेच ओमायक्रॉन वाढू नये यासाठी राज्य सरकारकडून खबरदारी घेतली जातेय. दररोज दीड ते दोन लाख नागरिकांची तपासणी केली जात असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे.