देश विदेश

धक्कादायक! ओमायक्रॉनचा पहिला बळी

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

13 Dece :- कोरोनाच्या महाकाय थैमानानंतर आता ओमायक्रॉनचे थैमान सुरु झाले असून ओमायक्रॉनने पहिला बळी घेतला आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने एक जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी या वृत्तास अधिकृत दुजोरा दिला. जगात ओमायक्रॉनमुळे झालेला हा पहिलाच मृत्यू आहे.

ब्रिटनच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंट फैलावण्याचा वेग दर दोन-तीन दिवसांनी दुपटीने वाढत आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी एका पत्रकारांशी संवाद साधताना एका व्यक्तीचा ओमायक्रॉनमुळे मृत्यू झाल्याची माहिती सोमवारी दिली. कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट माइल्ड असल्याचे सांगितले जात आहे. हा विचार सध्या बाजूला ठेवण्याची वेळ आली आहे.

किती वेगाने लोकांमध्ये कोरोनाचा (ओमायक्रॉन) फैलाव होत आहे ही गोष्ट स्वीकारायला हवी. असेही ते पुढे बोलताना म्हणाले. तर ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजिद जाविद यांनी सांगितल्याप्रमाणे, युकेमध्ये दर दोन ते तीन दिवसांनी ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा दुपटीने वाढत आहे. त्यामुळे, लसीचे दोन्ही डोस घेत असतानाच तिसऱ्या बूस्टर डोसवर देखील भर द्यायला हवा. चीनच्या शीजियांगा प्रांतात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचा नवीन स्ट्रेन सापडला आहे.

‘सब-लीनिएज AY.4’ असे या स्ट्रेनचे नाव असून या प्रांतात शीजियांग प्रांतात याचे 138 रुग्ण सापडले आहेत. रुग्णांची वाढती आकडेवारी पाहता पूर्वेकडील लोकांवर प्रवास बंदी लावण्यात आली आहे. कोरोनाची लागण झालेल्या लोकांच्या स्वॅबची जीनोम जीनोम सीक्वेन्सिंग करण्यात आली. यासोबतच, व्हायरस स्टडीमध्ये नवीन स्ट्रेन सब लीनिएज एवाय.4 तीन शहरांमध्ये पोहोचल्याचे दिसून आले. डेल्टा व्हेरिएंटमध्येही नवीन स्ट्रेन सापडल्याची ही पहिलीच वेळ आहे.