बीड

ओमायक्रॉन पसरु लागला! नागपूरमध्ये झाला शिरकाव

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

12 Dece :- ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूने राज्याची चिंता वाढत असल्याचे दिसत आहे. कारण मुंबई पुण्यानंतर आणि ओमायक्रॉन या विषाणूने राज्याची उपराजधानी नागपूरमध्येही शिरकाव केला आहे. नागपूरात एका 40 वर्षीय व्यक्तीला ओमायक्रॉन या विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. हा रुग्ण दक्षिण आफ्रिकेतून प्रवास करून आल्याची माहिती नागपूर पालिका आयुक्त राधाकृष्णन यांनी दिली आहे.

नागपूरात आढळलेल्या नव्या रुग्णामुळे राज्यात एकूण 18 ओमायक्रॉन रूग्ण झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेतून हा व्यक्ती नागपूरात आला होता, त्याची कोरोना चाचणीसह जीनोम सिक्वेन्सिंग केले असता त्यात त्याला ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. या रुग्णाची प्रकृती स्थिर असून, तो सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. संबंधित रुग्णाच्या कुटुंबातील इतर सदस्य निगेटिव्ह आले आहेत. त्यांना देखील विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

संबंधित रुग्णाच्या संपर्कातील इतर लोकांची ट्रेसिंग केली जात असून, त्या सर्वांच्या चाचण्या प्रशासनाकडून केल्या जाणार आहेत. चार डिसेंबर रोजी संबधित व्यक्तीचे नागपूर विमानतळावर नमुने घेतले होते. यामध्ये तो कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले होते. जनुकीय चाचणीत त्याला ओमायक्रॉन झाल्याचे समोर आले आहे.