बीड

संतापजनक! 14 महिन्याच्या मुलीचा मृतदेह आढळला

11 Dece :-नेकनूर-येथील जवळच असलेल्या नांदुरफाटामध्ये एका १४ महिन्याच्या मुलीचा मृतदेह आज (दि. ११) सकाळी बंधाऱ्यात तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घटनास्थळी नेकनूर पोलिसांनी धाव घेतली असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेकनूरच्या रुग्णालयात आणण्यात आला आहे.

अक्षरा बाबासाहेब पडूळकर (वय-१४ महिने) असे त्या मयत मुलीचे नाव आहे. बाबासाहेब पडूळकर यांच्या घराशेजारी बंधारा असून अक्षरा कालपासून बेपत्ता होती. आज सकाळी तिचा मृतदेह बंधाऱ्यात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. नेकनूर पोलीस ठाण्याचे शेख मुस्तफा, श्री. क्षीरसागर, श्री. सानप यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेकनूरच्या रुग्णालयात आणण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. दरम्यान कालपासून बेपत्ता असलेल्या अक्षराचा मृतदेह २४ तासानंतर घराशेजारील बंधाऱ्यात आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. आज सकाळपासून गावात अक्षराच्या घातपाताची चर्चा सुरु असून मृतदेहाची उत्तरीय तपासणीनंतर खरे कारण समोर येणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.