नाट्यपरिषदेकडून बीडच्या कलावंतांसाठी कार्यक्रमाची मेजवानी- डॉ. दीपा क्षीरसागर
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
10 Dece :- दोन वर्षांच्या लोकडाऊन नंतर अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषेच्या माध्यमातून बीडच्या कलावंतांसाठी रंगमंच खुला करण्यात आला. बीड हा कलाकारांचा जिल्हा असून सर्वच वयोगटातील कलाकारासाठी अनेक कार्यक्रमाची मेजवानी देण्याचे नियोजन असून त्याअंतर्गत नाट्य स्पर्धा, नृत्य स्पर्धा, प्रगट मुलाखत, बालनाट्य महोत्सव आणि अनेकविध कार्यक्रम आगामी काळात होणार असल्याचे सौ केएसके महाविद्यालयाच्या प्राचार्य तथा अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षा डॉ. दीपा क्षीरसागर यांनी सांगितले, त्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि सौ के एस के महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभाग अंतर्गत आयोजित एकपात्री व स्वगत अभिनय स्पर्धेच्या उद्घाटन वेळी बोलत होत्या.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक जेष्ठ रंगकर्मी आणि महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी पी.डी.कुलकर्णी म्हणाले की, वाचनाने जाणिवा प्रगल्भ होतात त्यामुळे अभिनयाच्या माध्यमातून रंगभूमीवर चिरकाल टिकता येते. माजी विद्यार्थी म्हणून माझ्या महाविद्यालयाला भेट म्हणून ह्या 300 जुन्या संहिता भेट देताना भरून पावलो आहे असे मत पी.डी. कुलकर्णी यांनी व्यक्त केले.येथील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा बीड आणि सौ. के.एस.के. महाविद्यालय नाट्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एकपात्री / स्वगत अभिनय स्पर्धा दिनांक 10 डिसेंबर रोजी संपन्न झाली.
दीप प्रज्वलन आणि नटराज पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून महाविद्यालयातच्या प्राचार्य डॉ.दीपा क्षीरसागर, कार्यक्रमाचे उदघाटक माजी विद्यार्थी, जेष्ठ रंगकर्मी पी.डी.कुलकर्णी सर, कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून कलाविष्कार प्रतिष्ठान (गेवराई) कार्यवाहक तथा नाट्यकलावंत दिनकर शिंदे, चित्रपट निर्माते, लेखक , दिग्दर्शक, एजाज अली सर, पत्रकार, सिनेअभिनेता प्रशांत रुईकर, दै. झुंजार नेताचे उपसंपादक तथा कलावंत प्रतिक कांबळे, सिनेअभिनेत्री डॉ उज्वला वणवे, जेष्ठ रंगकर्मी भरत अण्णा लोळगे, उपप्राचार्य डॉ हंगे, उपप्राचार्य सय्यद सर, कमवि पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर सर, नाट्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय पाटील देवळाणकर, प्रा, डॉ. दूषयनता रामटेके मॅडम, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या स्पर्धेला परीक्षक म्हणून कलाविष्कार प्रतिष्ठान (गेवराई) कार्यवाहक तथा नाट्यकलावंत दिनकर शिंदे, चित्रपट निर्माते, लेखक , दिग्दर्शक, एजाज अली सर, पत्रकार, सिनेअभिनेता प्रशांत रुईकर लाभले . ग्रामीण भागातून देखील भरपूर प्रतिसाद देत स्पर्धकांनी सहभाग घेतला.
यावेळी बोलताना दिनकर शिंदे म्हणाले की, ग्रामीण भागातून देखील आज कलाकार इथे सहभागी झाले, परीक्षण करताना आम्हाला प्रश्न पडावा असे कलाकार बीडच्या भूमीत आहेत. नाट्यपरिषद आणि महाविद्यालयाच्या वतीने आपण कलावंतांना दिलेली संधी ही कलाकारांसाठी केवळ एक व्यासपीठ नसून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी डॉ. दीपा ताई क्षीरसागर यांची तळमळ आणि बीडच्या भूमीत अनेक कलाकार जन्माला घालण्याचे काम इथे होत आहे. असे मत कला आविष्कार प्रतिष्ठानचे दिनकर शिंदे यांनी व्यक्त केले.
निकाल
यावेळी बालगटातून सर्वोत्तम अभिनय आत्मजा पांगरिकर, स्नेहल मुळे तर
प्रोत्साहनपर निर्जरा देशपांडे , देवेंद्र जोशी, राहुल धोत्रे, तसेच मोठ्या वयोगटात सर्वोत्तम अभिनय पल्लवी देशपांडे, युगसाक्षी गायकवाड, देविप्रसाद सोहनी, महेश जगताप, उत्कृष्ट अभिनय अभिजित लांडगे अंबाजोगाई यांना पुरस्कार मिळाला. स्पर्धकांच्या बक्षिसांचे आयोजन डी.एस.कुलकर्णी, मिलिंद शिवणीकर, आणि डॉ . संजय पाटील देवळाणकर यांनी केले होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ दुष्टांता रामटेके यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.संजय पाटील देवळाणकर यांनी केले.