News

कोरोनाचा धक्का; संगीतकार वाजिद खान यांचे मुंबईत निधन

मुंबई। बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये लोकप्रिय असणाच्या संगीतकार साजिद-वाजिद जोडीतील वाजिद खान यांचे मुंबईतील चेंबूर येथील रुग्णालयात निधन झाले आहे. आठवडाभरापूर्वीच वाजिद यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. आज प्रकृती खालावल्याने त्यांचे वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झाले.

रविवारी दुपारी त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. वाजिद यांना किडनीचा तसेच हृदयविकाराचा त्रास होता. वाजिद खान यांच्या निधनाने बॉलिवूला एका चांगल्या संगीतकाराला गमवावे लागले आहे. अभिनेता सलमान खानच्या अनेक हिट चित्रपटांना साजिद-वाजिदया जोडगोळीने श्रवणीय संगीतसाज चढवला होता.