बीड

अज्ञात वाहनाने धडक दिल्याने महिलेचा मुत्यु

27 Nov :- दिनांक 23/11/2021 रोजी संध्याकाळी ७ः ०० वाजण्याचे सुमारास मौजे घोडका राजुरी तलावात बीड ते परळी जाणारे रोडवर अदित्य हाॅटेल समोर अनोळखी महीलेस अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ती मृत पावली आहे. सदरील महिला कोण आहे? कुठून आली याची कुणालाच माहिती नाही.

या महिलेची ओळख पटण्यासाठी पिंपळनेर पोलिसांनी तपास मोहीम सुरू केली असून वर्तमानपत्र द्वारे या महिलेचा फोटो ओळख पटवण्यासाठी पाठवला आहे. फोटो पाहुन मयत महीला कोणाची नातेवाईक असल्यास पोलीस स्टेशन पिंपळनेर येथे संपर्क करावा असे आवाहन पिंपळनेर पोलिसांनी केले आहे. पोस्टे पिंपळनेर फोन
02442254533
9421733252