बीड

जुगाऱ्यांकडून पैसे घेऊन खिशात घालताना दिसले कुंडलिक खांडे

कुंडलिक खांडेचा पत्त्याचा क्लबवरील व्हिडिओ व्हायरल


27 Nov :- बीड – शिवसेनेचे स्थगिती मिळालेले बीड जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत माझा कोणत्याही अवैध धंद्यात सहभाग नसल्याचे स्पष्ट केले होते, तसेच माझ्यावरील असे आरोप सिद्ध झाल्यास मी राजकीय संन्यास घेईन असेही खांडेंनी वक्तव्य पत्रकार परिषदेत केले होते.

कुंडलिक खांडे यांचा व्हायरल झालेला खालील विडिओ पहा

या प्रकारानंतर आता एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे एका पत्त्याच्या क्लबमध्ये उभे असताना पाहायला मिळतात त्यात सतरंजीवर अस्ताव्यस्त पडलेले पत्ते, तोंडाला रुमाल बांधलेले जुगारी पाहायला मिळतात.

विशेष म्हणजे यातील एक जुगारी हळूच खांडे यांनी मागे हात घेताच त्यांच्या हातात पैसे देताना दिसत आहे व हे पैसे नंतर खांडे पॅंटीच्या डाव्या बाजूच्या खिशात ठेवताना सदरील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये स्पष्टपणे दिसत आहेत. जर कोणत्याच अवैद्य धंद्यात खांडे यांचा सहभाग नाही तर या ठिकाणी खांडे गेलेच का ? असा सवाल देखील निर्माण होतोय.

सदरील व्हिडिओ एक महिन्यापूर्वीचा असल्याचे बोलले जात आहे. 1 वर्षापूर्वी बीड शहर पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर छापा मारला होता व त्या प्रकरणात खांडे यांचे नाव आले होते परंतु सबळ पुरावे नसल्याने आणि सत्ताधारी पक्षाचे जिल्हाप्रमुख असल्याने खांडे यांचे नाव या प्रकरणात आले नाही. परंतु व्हायरल झालेला हा सदरील व्हिडिओ हा त्याच जुगार अड्डाचा असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.