बीड कोरोना रिपोर्ट
26 Nov :- जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा शुक्रवारी केवळ चार वर पोहचला.सात तालुक्यातील आकडेवारी शून्यावर आल्याने 683 रुग्णांच्या तपासणीनंतर केवळ 4 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .
बीड जिल्ह्यात गेल्या तीन चार महिन्यापासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यातील सर्व खाजगी कोविड सेंटर बंद करण्यात आले असून केवळ जिल्हा रुग्णालय अंडी ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
शुक्रवारी जिल्ह्यातील 683 रुग्णांची तपासणी केली असता त्यात बीड,आष्टी,केज आणि परळी या चार तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला आहे. बीड जिल्ह्यासह राज्यातील रुग्णसंख्या देखील झपाट्याने कमी होत आहे.