अन्यथा राजकारणातून कायमस्वरूपी संन्यास घेईल – कुंडलिक खांडे
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
25 Nov :- माझ्या सारखा सामान्य कुटुंबातील युवक शिवसेनेचा जिल्हाप्रमुख झाला हे काही प्रस्थापितांच्या जिव्हारी लागले होते. दरम्यान जिल्हाप्रमुख बनल्यानंतर ‘जिथे कमी तिथे मी’ या धोरणाने काम सुरू केले. माझा काम करण्या धडका पाहून आणि पक्ष संघटन पाहून अनेकजण अस्वस्थ झाले होते. मला कुठेतरी गोवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते. या परिस्थितीत मला गुटखा प्रकरणात गोवण्यात आले.
गुटखा प्रकरणी माझा संबंध नसताना केवळ महिलेला पकडून नेले म्हणून मी तिथे गेलो आणि माझ्यावर आकसबुध्दीने गुन्हा नोंद करण्यात आला. अखेर काल न्यायालयाने या प्रकरण मला जामिनही दिला. सत्याला परेशान करता येते परंतू पराजित नाही हे यातून स्पष्ट झाले आहे, असे कुंडलीक खांडे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. मला कसलाही राजकीय वारसा नाही, सामान्य शेतकरी कुटुंबातून मी शिवसेने सारख्या 20 टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण करणार्या पक्षाचा जिल्हाप्रमुख बनलो.
पद मिळाल्यानंतर माझ्या काम करण्याच्या पध्दतीतून आणि दिवसातील 16 तास काम करून शिवसेचा जिल्हांप्रमुख पक्ष संघटनेसाठी काय करू शकतो हे दाखवून दिले. झपाटून गेल्याप्रमाणे काम करण्याच्या माझ्या या पध्दतीमुळे काही जणांना ते रुचले नव्हते. याच लोकांचे काही तरी षडयंत्र रचून मला बदनाम करण्याचे प्रत्यन सुरू होते. पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे हे लोक माझ्या विरोधात तक्रारी करत, विरोधात निवेदनही देत होते. मात्र पक्षातील वरिष्ठ नेत्यांना माझ्यावर आणि माझ्या काम करण्याच्या पध्दतीवर विश्वास असल्याने त्यांची डाळ शिजत नव्हती. यात गुटखा प्रकरण घडले.
या प्रकरणाशी माझा काहीही सबंध नसताना मला गोवण्यात आले. केवळ महिलेवर अन्याय होत आहे, म्हणून मी तिथे गेलो. या व्यतिरिक्त या प्रकरणाशी माझा कसलाही सबंध नाही. गुटख्याचे गोडावून माझे नाही, पडलेली गाडी माझी नाही. असे असतानाही थेट माझ्यावर दाखल केलेला गुन्हा षडयंत्राचा भाग होता. न्यायालयाने यात जामीन मंजूर केला. आगामी काळात दुधाचे दुध आणि पाण्याचे पाणी होणार आहे.
षडयंत्रकारी लोक एखाद्या नेतृत्वाला परेशान करू शकतात परंंतू पराजित कदापीही करू शकत नाही. माध्यमांमधून चुकीची चर्चा सुरु आहे. शिवसेनेतील सर्व पदाधिकार्यांचा मला पाठींबा आहे. माझ्या पदाला स्थगिती देण्यात आली आहे. जर माझे पद अबाधित राहिले सर्वांना सोबत घेवून आणि अथवा मला पदावरुन दुर केल्यासही ज्या इच्छुकाची निवड होईल त्यांच्या सोबत मी एक शिवसैनिक म्हणून काम करणार आहे. कारण मी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेबांचा कडवट सैनिक आहे. पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब आणि ना.आदित्यजी ठाकरे साहेब जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल.