घाटात ट्रक उलटला
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
25 Nov :- खामगाव ते पंढरपूर महामार्गावर धारूरच्या घाटात ( दिं.२५ )नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजता पंढरपूर शिरपूरपांडुरंग सहकारी साखर कारखाना येथून रायपूर छत्तीसगड राज्याकडे साखर घेऊन चाललेला ट्रक क्रमांक MH ३४ BG४६१५ अरुंद रस्त्यांमुळे पलटी झाला या अपघात घुगे ड्रायव्हर दोन किन्नर जखमी असून त्यांना आंबेजोगाई ते शासकीय रुग्णालय मध्ये उपचार चालू आहेत.
खामगाव ते पंढरपूर हा रस्ता बनवताना गांवदारा गावापासून ते धारूरपर्यंतचा घाट माथा १२ कि.मी. महाराष्ट्र विकास राज्य रस्ते विकास महामंडळ जालना यांनी रस्त्याचे कोणत्याही प्रकारे रुंदीकरण केले नसून केवळ डांबरीकरण केले.पडझडीच्या बाजूला संरक्षक भिंती नाहीत,घाटात रस्त्याच्या खुणा नाहीत,अपघात झाल्यास कोणतीही यंत्रणा नाही,घाटात दीपस्तंभ नाहीत.
रात्री १२ वाजता पंढरपूर शिरपूरपांडुरंग सहकारी साखर कारखाना येथून रायपूर छत्तीसगड राज्याकडे साखर घेऊन चाललेला ट्रक क्रमांक MH ३४ BG४६१५ अरुंद रस्त्यांमुळे पलटी झाला या अपघात घुगे ड्रायव्हर दोन किन्नर जखमी असून त्यांना आंबेजोगाई ते शासकीय रुग्णालय मध्ये उपचार चालू आहेत. धारूर घाटात दिवसेंदिवस अपघातांची मालिका घडतच आहे. दररोज होणाऱ्या अपघातांमुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होत आहे.धारूर तालुक्याचे ठिकाण असल्याने शासकीय कामासाठी येणारे नागरिक, आरोग्य, बाजारपेठ, तसेच वाहतूकदार जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत.
वेळोवेळी धारूर घाट संबंधित दैनिकांमध्ये बातम्या प्रसिद्ध होत असून वेळोवेळी धारूरमधील सामाजिक संस्था तसेच राजकीय संघटना राज्य रस्ते विकास महामंडळ जालना याकडे निवेदन दिले. पण कोणतीही दखल घेतली नाही. घाटातील रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न खाजदार अशा घटना रोजच घडत आहेत आणि यापुढेही घडत राहतील.आमदार-खासदारांनी मार्गी लावावा, अशी मागणी जनतेतून व वाहक-चालकांकडून होत आहे.