बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध अटक वारंट जारी
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
24 Nov :- शासकिय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करण्याच्या संदर्भाने दाखल याचिकेत न्यायालयाच्या निर्णयानंतरही निर्णय न घेतल्याने दाखल झालेल्या अवमान याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बीडचे जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या विरूध्द अटक वॉरंट बजावले आहे.
सदर अटक वॉरंट जामिनपात्र असून यातील पुढील सुनावणी जानेवारीमध्ये होणार आहे.आष्टी तालुक्यातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण प्रकरणात थेट जिल्हाधिकार्यां विरूध्दच अटक वॉरंट बजावण्यात आलंय.
आष्टी तालुक्यातील शासकिय जमिनीवर करण्यात आलेले अतिक्रमण नियमानुकूल करण्याबाबत सहा महिण्यात निर्णय घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सप्टेंबर 2020 मध्ये दिले होते. मात्र जिल्हाधिकार्यांनी त्याची अंमलबजावणी केली नाही. म्हणून यासंदर्भात न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे.