बीड

बीड जिल्हाप्रमुख पदाला स्थगिती

बीड दि 22 ( प्रतिनिधी ) शिवसेनेचे बीड जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर केज येथे दाखल झालेल्या गुन्ह्या नंतर त्यांच्याकडील जिल्हा प्रमुख हे पद काढून घेतले जाणार हे नक्की झाले होते. आणि ते थोड्याफार प्रमाणात खरे देखील ठरले करण आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून कुंडलिक खांडे यांच्या पदाला स्थगिती आल्याचे वृत्त प्रकाशित करण्यात आले आहे.

जिल्हाप्रमुख या पदावर कार्यरत असताना कुंडलिक खांडे यांच्याकडून अनेकदा स्वतःच्या पदाचा दुरुपयोग झाल्याचे दिसून आले होते. परंतु वारंवार सत्तेचा वापर करत स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावण्यात यशस्वी ठरले. मात्र केज येथे दाखल झालेल्या गुन्हा नंतर त्यांच्यावर पक्षाच्या आतून आणि माध्यमातून प्रचंड टीका करण्यात आली. आज एका दैनिकात आलेल्या बातमी नंतर जिल्ह्यातील सर्व शिवसेना अंग झटकून कामाला लागत आपल्याच जवळच्या नेत्याच्या गळ्यात जिल्हाप्रमुख पदाची माळ पाडावी यासाठी अनेकांनी कंबर कसली आहे.

अनिल जगताप, परमेश्वर सातपुते, गणेश वरेकर, दिलीप गोरे यांच्या नावाची चर्चा आहे तर गणपत डोईफोडे आणि अरुण डाके हे दोन नावे बीडच्या एका जबाबदार नेत्याने पक्षश्रेष्ठींकडे जिल्हाप्रमुख पदासाठी दिली असल्याचे सूत्रांकडून समजते.
    केज येथे दाखल झालेल्या गुटका प्रकरणी कुंडलिक खांडे यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच जात आहेत,याच प्रकरणात त्यांना मोठी राजकीय किंमत चुकवावी लागणार हे त्याच क्षणी लक्षात आले होते. तसे बघितले तर कुंडलिक खांडे यांची जिल्हाप्रमुख पदाची कारकीर्द ही कायमच या ना त्या कारणाने चर्चेत राहिली आहे.

गेल्या वर्षी देखील एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकलेल्या धाडी नंतर कुंडलिक खांडे यांचे नाव समोर आले होते परंतु सदरील जागा दुसऱ्याच्या नावावर असल्याचे दाखवत त्यांना या प्रकरणातून बाहेर पडण्यात मदत झाली होती. तरीदेखील अनेक पोलिसांच्या खाजगीतील बोलण्या नुसार बीड शहरातील काही जुगार आहे हे कुंडलिक खांडे यांचे असल्याचे समजते. आता कुंडलिक खांडे यांच्या पदाला स्थगिती मिळाल्यामुळे पोलीस खात्याला देखील योग्य दिशेने तपास करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.