बीड

बीडमध्ये धाडसी चोरी; 23 तोळे सोने लंपास

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

25 Oct :- बीड शहरासह जिल्हाभरामध्ये गेल्या काही महिन्यापासून चोऱ्याचे प्रमाण वाढले. शहरातील शिंदेनगर भागात रात्री धाडसी चोरी झाली. घरी कोणी नसल्याचा फायदा उचलून चोरट्याने एका घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील नगदी दीड लाख रूपयासह 23 तोळे सोने लंपास केले. घर मालक पहाटे पुण्याहून आल्यानंतर त्यांना आपल्या घरात चोरी झाल्याचे दिसून आले.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलीसांना कळवण्यात आले. पोलीसांनी चोरीच्या तपासासाठी डॉग स्कॉड, फिंगरप्रिंट पथक, एलसीबी घटनास्थळी दाखल केली. धनंजय अरूण जगताप रा. शिंदेनगर हे काही कामानिमित्त पुण्याला गेले होते. त्यांच्या घराला कुलूप असल्याने याच संधीचा फायदा अज्ञात चोरट्याने उचलून त्यांच्या घराचे कुलूप तोडले. घरातील नगदी दीड लाख रूपयासह 23 तोळे सोन्याचे दागिने, 14 जीवंत काडतुसे पळवले.

पहाटे धनंजय जगताप हे घरी आले असता त्यांना आपले घर उघडे दिसले व घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या बाबत शिवाजीनगर पोलीसांना कळवले. ठाण्याचे एपीआय शेख यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. चोरीच्या तपासासाठी डॉग स्कॉड पथक, एलसीबी, फिंगरप्रिंट पथक दाखल झाले होते. या प्रकरणी दुपारी पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती, दरम्यान गेल्या काही दिवसापासून बीड शहरासह जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात चोऱ्याचे प्रमाण वाढलेले आहे. पोलीस प्रशासनाचा गुन्हेगारावर वचक राहिला नसल्याने अशा पद्धतीच्या घटना वाढत असल्याचे दिसून येत आहे.