बीड

मुख्याध्यापक दिलीप कंठाळे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान


बीड, 5 ऑक्टोबर ( प्रतिनिधी) :- जागतिक शिक्षक दिनानिमित्त आविष्कार फाउंडेशन कोल्हापूर, इंडिया यांच्या वतीने जनता विद्यालय काकड हिरा तालुका पाटोदा जिल्हा बीड या विद्यालयाचे आदर्श मुख्याध्यापक श्री. दिलीप कंठाळे सर यांना ” राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2021 “”पनवेल मुंबई या ठिकाणी प्रदान करण्यात आला.


या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. शहाजीराव शिरसागर ( राज्य लेखा समिती अध्यक्ष महाराष्ट्र राज्य) कोकण विभागाचे शिक्षक आमदार श्री बाळाराम पाटील श्री सुनिल पवार( उप आयुक्त पनवेल महानगरपालिका) श्री सुनील नारकर( समाजसेवा प्रसिद्ध उद्योगपती मुंबई) श्री गजानन राव जाधव( प्रसिद्ध उद्योगपती मुंबई) अविष्कार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. संजय जी पवार( ज्येष्ठ पत्रकार) व इतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार दीप मिलन हॉल, दीप सिटी पनवेल प्राप्त या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते रविवार दिनांक 17/10/2021प्रदान करण्यात आला.


संस्थेच्या वतीने विद्यालयाच्या वतीने व समस्त ग्रामस्थांच्या वतीने पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी त्यांच्या समवेत श्री पाखरे बळीराम सर, श्री रवींद्र चौधरी पाटील (मुख्याध्यापक ) श्री प्रकाश कंठाळे श्री शंकर सानप पुरस्कार स्वीकारताना उपस्थित होते. मुख्याध्यापक दिलीप कंठाळे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन आणि कौतुक होत आहे.