मा. मुख्यमंत्र्याच्या मुलाचा आगीत होरपळून मृत्यू
ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
5 Oct :- नवी दिल्ली, शिलाँग-गुवाहाटी राष्ट्रीय महामार्गावर जळीत कारची थरारक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाचा होरपळून मृत्यू झाला आहे. ही आग इतकी भीषण होती की, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होईपर्यंत, कार पूर्णपणे जळून खाक झाली होती.
बर्निंग कारच्या थरारामुळे बराच काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फर्डिनँड बंशानलांग लिंगदोह असं संबंधित दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव असून ते मेघालयचे माजी मुख्यमंत्री ई. के. मावलोंग यांचे सुपूत्र आहेत.
मेघालयमधील काँग्रेसचे विद्यमान आमदार जॉर्ज लिंगदोह हे त्यांचे भाऊ असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. मृत फर्डिनँड लिंगदोह यांच्या नातेवाईकांनी घटनेची पुष्टी केली आहे. मृत फर्डिनँड बंशानलांग लिंगदोह हे इम्फाळमधील केंद्रीय कृषी विद्यापिठात एक प्राध्यापक म्हणून काम करत होते. दरम्यान दोन दिवसांपूर्वी शिलाँग-गुवाहाटी राष्ट्रीय महामार्गावर एका कारमध्ये त्यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला आहे.
कारला नेमकी आग कशी लागली? याबाबत कोणतीही माहिती समोर आली नसून पोलिसांकडून आगीच्या नेमक्या कारणाचा शोध घेतला जात आहे. एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होईपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती.