36 जण निगेटिव्ह तर दोन जणांचे प्रलंबित
बीड,दि.31(प्रतिनिधी):-बीड जिल्ह्यातून आज 38 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 36 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून असून दोन जणांच्या रिपोर्ट प्रलंबित राहिले आहेत अशी माहिती लातूर येथील स्व.विलासराव देशमुख शासकिय वैद्यकिय विज्ञान संस्था यांच्या वतीने कळविण्यात आली आहे.