महाराष्ट्र

कोळशाचा ठणठणाट; राज्याची वाटचाल अंधाराकडे

ZunjarNeta Live! वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

5 Oct :- राज्यात अर्धा ते दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा उपलब्ध आहे. त्यामुळे औष्णिक वीज केंद्रातील चार युनिट बंद आहे. याचा मोठा फटका बसण्याची शक्यता अधिक आहे. वीज उत्पादन ठप्प होण्याची भीती असून राज्य अंधारात जाण्याची शक्यता अधिक आहे. राज्यात औष्णिक वीज केंद्रांमध्ये कोळशाची टंचाई निर्माण झाली आहे. अर्धा ते दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा उपलब्ध आहे.

कोळशाअभावी औष्णिक वीज केंद्रातील चार युनिट बंद असून राज्यातील वीज उत्पादन ठप्प होण्याची भीती आहे. पुरेसा कोळसा उपलब्ध नसल्याने महत्वाच्या चार युनिटचे उत्पादन बंद पडले आहे. कोराडी औष्णिक वीज केंद्रातील 660 मेगावॅट क्षमतेचे युनिट क्रमांक 6 सुद्धा याच कारणामुळे कधीही बंद होऊ शकतो. तीन दिवसापेक्षा कमी कोळशाचा साठा असेल तर वीज केंद्रासाठी अतिसंवेदनशील स्थिती मानली जाते.

राज्यातील सर्वच वीज केंद्र सध्या या श्रेणीत आले आहेत. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रासह राज्यातील औष्णिक वीज केंद्रांना अपुरा कोळसा पुरवठा होत आहे. गेले काही दिवस राज्यातील अतिवृष्टी होत आहे. चंद्रपूर जिल्हा कोळसा उत्खननात अग्रेसर आहे. या एकट्या जिल्हा व आसपास 50 हुन अधिक कोळसा खाणी आहेत.

अतिवृष्टीमुळे कोळसा खाणीतील उत्खनन थंडावले आहे. याशिवाय खोदकाम झालेला कोळसा वाहतुकीची समस्या आहेच. परिणामी औष्णिक वीज केंद्राजवळ अत्यल्प कोळसा साठा शिल्लक आहे. महानिर्मितीकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवसचा साठा पुरण्याची शक्यता आहे.